Home महाराष्ट्र OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीसाठी भाजपाकडून 26 जून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील विविध भागात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (कोल्हापूर), रावसाहेब दानवे (जालना), पंकजा मुंडे (पुणे), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), चंद्रशेखर बावनकुळे (वर्धा), आशिष शेलार (मुंबई), मंगलप्रभात लोढा (मुंबई), गिऱीष महाजन (जळगाव), संजय कुटे (अमरावती) यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या भागात आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी

करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे

“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपूरमधील निवासस्थानी ED चा छापा”