Home महाराष्ट्र “विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”

“विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”

मुंबई : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये नर्सेसनी हे आंदोलन केलं.

रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात परिचारिकांनी आंदोलन केलं.

दरम्यान, या आंदोलनात परिचारिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता.

काय आहेत परिचारिकांच्या मागण्या

  • महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये.
  • परिचारिकांना रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी, कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी.
  • कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क, इतर साहित्य त्वरित मिळावे.
  • कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी.
  • हृद्यरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटीमध्ये सूट मिळावी.
  • कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यू आल्यास शासनाने घोषित केलेली 50लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.
  • परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना 300 रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा.
  • कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.

महत्वाच्या घडामोडी-

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

अनैसर्गिक युतीची आहे, जास्त काळ टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांच महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी