आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या बंडामुळे आता शिवसेनेत 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा गट उद्धव ठाकरेंचा.
तसेच पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे मुंबई महापालिकेवर सत्ता कायम राखण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र अशातच आता शिवसेनेचं बळ वाढलं आहे. कारण पंढरपूरातून असंख्य वारकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर, म्हणाले…
आज अखिल वारकरी संघ आणि राष्ट्रीय कीर्तनकार संघाने पंढरपूरातून पायी चालत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना आपला कायमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरेंनी वारकऱ्यांना आश्वासन दिलं. आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी रुग्णालय आणि वारकरी भवन उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करेल, असं आश्वासन ठाकरेंनी यावेळी वारकऱ्यांना दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पंकजा मुंडेच्या पदरी पुन्हा निराशा; ‘या’ 2 नेत्यांवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण
“शिवसेनेच्या ताकदीत वाढ; नाशिकमधील अनेक मुस्लीम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”“पंकजा मुंडेच्या पदरी पुन्हा निराशा; ‘या’ 2 नेत्यांवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”