Home पुणे पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण

पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यभरात गणरायाच्या विसर्जनाची काल सांगता झाली. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये राजकीय नेतेसुद्धा सहभागी झाले होते. पुण्यातील कसबा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे एकत्र आल्याचं काल पहायला मिळालं.

हे ही वाचा : “शिवसेनेच्या ताकदीत वाढ; नाशिकमधील अनेक मुस्लीम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”

कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असताना आदित्य ठाकरे तिथे आले. यावेळी चंद्रकांत पाटील हे आधीपासूनच तिथे होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना, आधी दर्शन घ्या, असं त्यांना म्हटलं. आदित्य ठाकरे आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण त्यांची वाट पहात थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली.

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांशी गप्पा मारताना सुद्धा दिसून आले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला

मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला

शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…