आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथील राजुरा नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मात्र पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी पुतळ्याच्या भागावरच पाय दिला. यावरूनच आता भाजप आक्रमक झालं आहे.
हे ही वाचा : भाजप कार्यकर्त्यांवरील अटकसत्र थांबवा, अन्यथा…; नारायण राणेंचा इशारा
महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार, वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? , असं भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, केशव उपाध्ये यांनी वडेट्टीवार यांचा पुतळ्यावर पाय देतानाचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका
“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”
कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला