आता तरी, लोकांना खात्री पटली की, राष्ट्रवादीनंच शिवसेना संपवली; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
222

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याआधी अनेकदा केला आहे. मात्र आज पुन्हा एकदा केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनेच शिवसेना संपवली, असं केसरकर म्हणाले आहेत. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : …यासाठी उद्धव ठाकरेंनी 5 कोटी घेतले; नारायण राणेंचा मोठा आरोप

उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असंही केसरकरांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का; बोदवडचा गड राखला

शरद पवारांच्या आत्मचरित्र्यात भाजप-शिवसेनेबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

नाना पटोलेंना मात देण्यासाठी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती, मात्र काँग्रेसनं गड राखला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here