मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल महोदयांचा अपमान होतो हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती नाही, म्हणजे प्रशासनावर यांची पकड नाही का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज्यपालांना विमानातून उतरवलंय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची ची घमेंड उतरवेल, असं म्हणत महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार का करतेय?, असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय.
राज्यापालांना विमानातून उतरवले आहे या ठाकरे सरकारची घमेंड जनता उरवेल!
महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार का करतेय?@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/yQMzhaO3sb— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 11, 2021
महत्वाच्या घडामोडी
BREAKING NEWS! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं, आता जनता तुम्हांला सत्तेतून उतरवेल- सुधीर मुनगंटीवार
राज्यपालांना विमान नाकारणं हा दुर्दैवी प्रकार; ठाकरे सरकार इगो असलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस
राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरत राज्यपाल थेट राजभवनात