Home महाराष्ट्र आता, एक ओबीसी, लाख ओबीसी, म्हणाल का?; पंकजा मुंडेंच्या आवाहनाला, मनोज जरांगेंचं...

आता, एक ओबीसी, लाख ओबीसी, म्हणाल का?; पंकजा मुंडेंच्या आवाहनाला, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या 6 महिन्यांपासून चालू असलेल्या मराठा आंदोलनाला अखेर यश आलं आहे. काल मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र जरांगेंकडे सुपूर्द केलं.

तसेच त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. आता या सर्व प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा : ‘…त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली’; नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

मराठ्यांसाठी अध्यादेश निघाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं आहे. परंतु आता मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये येणार असल्याने पंकजा मुंडे यांनी, आता ‘एक मराठा…लाख मराठा’, अशी घोषणा देण्याऐवजी, ‘एक ओबीसी, लाख ओबीसी’ अशी घोषणा द्यावी असं आवाहन केलं होतं. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक कोटी मराठाही आम्हीच, ओबीसी आणि मराठा दोन्ही आम्हीच आहोत. शेतकरी आम्हीच आणि लढाऊ क्षत्रिय शेतकरीही आम्हीच आहोत. 100 टक्के आरक्षण होणार आहे. तेवढे हो द्या. मग देऊ प्रतिक्रीया’, असं जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

सर्कशीतल्या जोकरप्रमाणे…; मनसेची सदावर्तेंवर सडकून टीका

 …म्हणून ‘ते’ गुन्हे मागे घेता येणार नाही; मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांचं थेट विधान

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’