आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान सूरूच आहेत. यावरून आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
हे ही वाचा : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; थेट अजित पवारांकडून ऑफर
दरम्यान, महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत, जयंत पाटील, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे नेते उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर त्यांची जीभ छाटली पाहिजे; शिवरायांवरील वक्तव्यावरून रूपाली पाटील आक्रमक
भाजप नेत्यांकडून शिवरायांचा अवमान सूरूच; आता रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, म्हणाले…
“ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”