आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र आज त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. अशातच नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मनसेही रस्त्यावर उतरली आहे.
महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्र संदीप देशपांडे यांनी विभागाच्या आयुक्तांना दिलं आहे.तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील कोकण भवन कार्यालयावर मनसेने मोर्चाही काढला आहे.
हे ही वाचा : ‘…तर तुमचे वांदे होतील’; निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना टोला
आम्ही कौशल्य विकास योजनेचा जो कारभार किती बोगस आहे हे पुराव्या सह त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना आम्ही विनंती केली आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. पण कंपन्या रजिस्ट्रेशन झालं पाहिजेत. या विभागाचा शंभर कोटीच्यावर टर्न ओवर आहे आणि कंपन्या रजिस्ट्रेशन होत नाही. मनसे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणार ज्याकडे भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. राज साहेबांनी पत्राच्या माध्यमातून त्यांना भूमिपुत्रांनसाठी रोजगार निर्मिती करा, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
दरम्यान, आमचा नवाब मलिकांना विरोध नाही परंतु नवाब मलिक यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार विभाग येतात. ते जावून जेल मध्ये बसले आहेत. आम्ही जॉब कोणाला विचारयचा. आम्हाला काम करावे लागणार आहे कारण मंत्री जेल मध्ये आहे. राजीनामा द्यायचा की नाही त्यांचा पक्ष ठरवेल. आमचा प्रश्न आहे की उदया आम्हाला मंत्री भेटले नाही तर आम्ही आर्थर रोड जेलला भेटण्यासाठी जायचं का? असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तृतीयपंथी सपना आणि बाळू अखेर अडकले विवाह बंधनात!
मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेना महिला नेत्याचा मनसेत प्रवेश
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश