आता महाविकास आघाडीचं सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार- प्रवीण दरेकर

0
439

उस्मानाबाद : भाजप आता महाविकासआघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते उस्मानाबादमध्ये टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, चांगल्या गोष्टी असेल तर बदल झाला पाहिजे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भाजपचे इतर नेत्यांनीही सरकार बदलासंदर्भात बोलणे बंद केले तर ते चांगले ठरेल., असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला

“पुण्यातील ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी लागू”

“‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवीन CUTENESS फोटोशूट; फोटो बघून चाहते घायाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here