“आता काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

0
299

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच या भेटीनंतर ही सदिच्छा भेट असल्याचा खुलासा, माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. आम्ही शिंदे गटात प्रवेश केला नसून, आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली., असं दळवी यांनी यावेळी सांगतिलं. तसेच यावेळी शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी व काँग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांवर कारवाईबाबत चर्चा झाल्याची माहिती दळवी यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : “ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”

दरम्यान, या भेटीबाबत बोलताना नगरसेवक देवानंद थळे यांनी सांगितलं की, भिवंडी शहराच्या विकासाकडे नेहमीच सर्वांनी दुर्लक्ष केले. मात्र आता एकनाथ शिंदे हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, ते मुख्यमंत्री झाल्यामुळे शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”

उद्धव साहेब, मी तुमच्यासोबत; बीडच्या कट्टर शिवसैनिकानं रक्तानं लिहिलं पत्र

“देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?, यशवंत सिन्हा की द्राैपदी मुर्मू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here