मुंबई : करोनामुळे राज्य सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीबरोबरच रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावीं, अशी विनंती राज्य सरकार कडे केली आहे.
शेतकऱ्यांना भर उन्हात, रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, नांगरट व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागतं. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावं, ही विनंती, असं रोहित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना भर उन्हात /रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, नांगरट व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागतं. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावं, ही विनंती.@OfficeofUT @AjitPawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 25, 2020
दरम्यान, चालू साखर कारखान्यांनी आपल्या ऊसतोड कामगारांची आहे. तिथेच काळजी घ्यावी. तर गावाकडे निघालेल्या कामगारांना घरी परतण्यासाठी पोलिसांनी मदत करावी. याबाबत मी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही बोललो असून त्यांचंही याकडं बारकाईनं लक्ष आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
कोणीही गोंधळू नका, घाबरु नका; देशात लॉकडाऊन पण ‘या’ सेवा कधीच बंद होणार नाहीत- मुख्यमंत्री
लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधांना सवाल
“आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ”
“लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूया”