शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा

0
310

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकरावर निशाणा साधला.

हे ही वाचा : वेळ आल्यावर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

आर्यन खानच्या दिमतीला लागणारं सरकार पोलिसांची ढाल करून एसटी कर्मचा-यांना दंडुक्याची भिती दाखवतेय… लोकशाही मार्गानं सुरू असलेलं आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकार प्रयत्न करतयं… सरकार आपल्याच कर्मचाऱ्यांना का घाबरतंय ?? शिवशाही नाही मोगलाई सुरूहे..
हम करे सो कायदा चालणार नाही, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घेतली भेट; चर्चांना उधाण”

जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीसमोर ‘या’ नव्या पॅनलचं आव्हान

एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here