Home महत्वाच्या बातम्या एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित

एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपाबद्दल सरकारने कारवाई करणे सुरू केले. राज्यभरातील 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यानंतरही संघटनांनी संप सुरू ठेवल्याबद्दल एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करणार आहे. तर संप मागे घ्या, असे आवाहन सरकार करत आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी वाहतूक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.

हे ही वाचा : टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बाॅसमध्ये जावं- निलेश राणे

दरम्यान, नाशिक विभागातल्या कळवण आगारातील 17, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारांमधील 40, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारांतील 14, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा आगारांतील 14, लातूर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमपूर, लातूर आगारातील 31, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर आगारांतील 58, भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारांतील 30, सोलापूर विभागातील अक्कलकोट आगारामधील 2, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारांतील 57, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद आगारातील 5, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारांतील 10, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारांतील 16, नागपूर विभागामधील गणेशपेठ घाटरोड, इमामवाडा, वर्धमान नगर आगारांतील 18, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील 4 कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील 2 सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाडी आगारांतील 58 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

मनसेत प्रवेशाचा धडाका; नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश

‘जय भीम’ चित्रपटावर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…’