आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या बंडखोरीवरून आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर आता हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोरांवर केला. मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्विकारा; रामदास आठवलेंचं, प्रकाश आंबेडकरांना आवाहन
तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, त्यातल्या सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी., असा टोलाही उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.
शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर केली. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? कोर्टावर माझा विश्वास आहे. पण आता ते निवडणूक आयोगाला सांगत आहेत, आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी. यासाठी आग्रह धरण्याची गरज उद्धव यांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा
उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा
मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला