Home महाराष्ट्र समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्विकारा; रामदास आठवलेंचं, प्रकाश आंबेडकरांना...

समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्विकारा; रामदास आठवलेंचं, प्रकाश आंबेडकरांना आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधता येणं अशक्य आहे. याचंच एक उत्तर उदाहरण म्हणजे, राज्यातील महाविकास आघाडी सरकार. शिवसेनेनं भाजपसोबत असलेली पारंपरिक युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जावून सरकार स्थापन करेल, असं कधी कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र प्रत्यक्षात ते घडलं. हे राजकीय उदाहण आठवण्याचं कारण म्हणजे रिपाई अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं विधान.

रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षासोबत एकत्र यावं, असं खुलं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. रिपाईच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळाली कॅम्प शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा

रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचंदेखील आठवले म्हणाले.

बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही त्यांचा माणूस निवडून आला नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष, मनसे पण एक आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की, समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा. नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, असंही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला

“मोठी बातमी; शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेला ‘हा’ नेता पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतला”

“सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”