आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे 12 खासदारदेखील बंडखोरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे 12 खासदार आज शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावा केला जातोय. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी तब्बल 18 खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : भाजपाच्या ‘या’ महिला नेत्यावर झाला हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान, शिंदे आज शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच सध्या सर्व खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत असतानाच काल रात्री शिंदे सुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Delhi | Shiv Sena MPs will meet us. We have 18 MPs, not just 12: Maharashtra CM Eknath Shinde on virtual meeting with Shiv Sena MPs pic.twitter.com/KzmTziVIAr
— ANI (@ANI) July 18, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
12 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…
“राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
“उद्धव ठाकरेंनी गोड बोलून, मनसेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला”