मुंबई : कोरोना काळात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. पण तसं दिसत नाही. किमान निर्णय प्रक्रियेतून तरी तसं दिसून आलं पाहिजे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ते आम्हाला अनेकदा सूचना करायचे. त्याचप्रमाणे सरकारलाही ते सूचना करत असतील. त्यामुळे त्या सूचनांची अंमलबजावणी कशी करायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआर क्षेत्रातील कोविडच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला- नारायण राणे