Home महाराष्ट्र “संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”

“संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”

मुंबई : मनसेने 27 फेब्रुवारीच्या मराठी भाषेच्या दिनानिमित्त मुंबईत आजोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. यावरुन मनसे नेते अमेय खोपकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करुन मनसेने ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला, अस अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

ज्याच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात. अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो?, महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच मराठी आहे की काय?, असं अमेय खोपकर म्हणाले.

दरम्यान,  आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, असंही खोपकरांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अबब! कंडोमच्या नादात गमावले तीन लाख रुपये

“टीम इंडियाच्या ‘या’ धडाकेबाज फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा”

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र