मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना रणाैत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना ते भेट देतात. मात्र मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेत प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका तरी दाखल करा, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले. त्यामुळे मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही, असा पलटवार दरेकर यांनी यावेळी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे
सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं?; नारायण राणेंचा घणाघात
हे कुणाचे टूलकिट आहेत?, त्यांची एवढी हिंमत कशी झाली?; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या