मुंबई : तामिळनाडूमधील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न देण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशाच्या घटनेने दिलेले आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही आणि सध्याचे केंद्र सरकार हे आरक्षण सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. सोशल मीडियावर आरक्षण रद्द करण्याचा खोटा प्रचार करणारे लोक आरक्षणाला विरोध दर्शवित आहेत, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
दरम्यान, रामदास आठवले यांनी याविषयी ट्विट करत सोशल मिडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
देश के संविधान द्वारा दिये गये आरक्षण को मेरे रहते हुए कोई समाप्त नही कर सकता है और वर्तमान केंद्र सरकार आरक्षण निरन्तर जारी रखने के लिए प्रतिबद्ध है । आरक्षण समाप्त किये जानें का झूठा प्रचार सोशल मीडिया मे करने वाले लोग जरूर आरक्षण के विरोधी प्रतीत हो रहे है । pic.twitter.com/cvMu5lCIah
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली…
अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
काँग्रेस नेते आणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अतुल भातखळकरांचा टोला ; म्हणाले…