नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तत्काळ पत्रकारपरिषद घेत शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेतील वक्तव्यांवर टिप्पणी केली.
आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरच आहे परमबीर सिंग यांच्याच समितीने वाझे यांचं निलंबन रद्द करून, त्यांना पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने व निर्देशाने हे काम परमबीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Interacting with media at Nagpur https://t.co/3xuTJWvHlw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील
परमबीर सिंग लेटर! सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, पण…- शरद पवार
अनिल देशमुखांची कसून चौकशी करा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे- राज ठाकरे
उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत- चंद्रकांत पाटील