अहमदनगर : भाजपने कितीही डोके आपटले तरी महाविकास आघाडी भक्कम राहील व पाच वर्षे पूर्ण करेल, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे श्री शनैश्वर देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयात दीपक फर्टीलायझर कंपनीच्या मदतीने उभारलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राणे यांच्यासारखे अनेक जण पक्ष सोडून गेले. परंतु आजही त्यांची ओळख शिवसेनेमुळेच आहे आणि शिवसेना ताठ मानेने उभी आहे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी गुजरातप्रमाणेच एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी अनेकांचा मृत्यू झाला, मात्र केंद्र सरकार आकडेवारी लपवत आहे. महाराष्ट्रात मात्र प्राणवायू अभावी एकही मृत्यू झाला नाही. त्यांनी करोनाची हाताळणी देशात चांगल्याप्रकारे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. ‘महाराष्ट्र मॉडेल‘ने करोनाची यशस्वी हाताळणी केल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली- गिरीश महाजन
“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते कलेक्शन ऑफिस झालंय”
“शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो; प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”