आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळावं, या मागणीनं पुन्हा एकदा जोरद धरला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावं की अन्य काही करावं हा विरोधकांचा प्रश्न आहे. परंतु भाजपविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमिताभ-जया-रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण”
दरम्यान, चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”
“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”
“मोठी बातमी! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, आदित्य ठाकरे सुखरूप”