मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पत्रकार परिषदेपूर्वी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. यावेळी पोलिसांना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश राणेंनी कालच्या झालेल्या घटनाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
करुणा मुंडेची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडे ने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
करुणा मुंडेची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडे ने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही. pic.twitter.com/urNYfxve5G
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवताय?”
“करूणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”
धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने रिव्हाॅल्व्हर माझ्या गाडीत ठेवली; करूणा मुंडेंचा आरोप
आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या