Home पुणे आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी...

आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या

पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

यानंतर तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर सरपंच गौरी गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या सोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यादेखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेमध्ये इतके धिंडवडे कुठेही बघितले नव्हते. आज दिवसा ढवळ्या बायकांवर हल्ले होत आहेत. एका बाईची बोटं तोडून टाकली, दुसऱ्या बाईला अॅट्रोसिटीच्या नावाखाली धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही विचारू का कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? याची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील ते आपल्या राज्याचे प्रमुख आहेत, कुटुंब प्रमुख आहेत, यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाब विचारुन याचं उत्तर द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल”

“शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे, तरीही म्हणतात पाठीत खंजीर खूपसलं नाही”

करूणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तुल, पोलिसांकडून तपास सुरू

“मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही”