Home महाराष्ट्र कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे

कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे

मुंबई : पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीनं पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबद्दल सखोल चौकशी केली जाईल, आणि जे सत्य आहे ते जनते समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेले काही दिवस, काही महिने काहीवेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो, तर असंही होता कामा नये आणि त्याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही, याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते चौकशीनंतर जनतेसमोर येईल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार शिंदे

राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं- रामदास आठवले

दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार