मुंबई : दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे.
घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.#vaccine @PMOIndia pic.twitter.com/60FTKjJUCU— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा
“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”
“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर