Home पुणे मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा

मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यानंतर राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील., अशी घोषणा भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्ष ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असं जगदीश मुळीक यांनी सांगितलं. तसेच महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असंही जगदीश मुळीक यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…’ही’ तर भाजप सरकारची कायरता; नवाब मलिकांची केंद्र सरकारवर टीका

“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”

“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर