आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती नको, असं विधान शिंदे गटातले मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
ज्या ज्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघासारखी परिस्थिती असेल, तिथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी विचार करावा., असं सत्तार म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “अजित पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध असायला हवेत. शेवटी निवडून आल्यावर आपण दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये सोबत राहू, जिल्ह्यात, महापालिकेत सोबत राहू पण स्थानिक लेव्हलवर जर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोघेच असू तर त्या दोघांमध्ये जो निवडून येईल, तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल, असंही सत्तारांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, एकीकडे शिंदे गट भाजपसोबत सत्ता स्थापन करून सरकार चालवत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातल्या मंत्र्याच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलं नाही, आता पंकजा मुंडेंचा पलटवार, म्हणाल्या…
अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…