नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामात होत असलेल्या अडवणुकीबाबत एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दलचं पत्र गडकरींनी लिहिलं आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी हे ‘विकासपुरूष’ आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात याला जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, अशी आशाही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी –
“चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”
…तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल
शिवसेना-भाजप युती संदर्भात संजय राऊतांशी चर्चा; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला सुरुंग लागण्याची चिन्हे ; 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?