Home महाराष्ट्र “चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”

“चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात अजून एफआयआर दाखल झाला नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे याबाबत पुन्हा विचारणा केली. यावर आता स्वत: पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निर्णयात पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी पावलं उचलली. शिक्षक भरती हा एकमेव विषय नाही. तुम्ही मला बघितलं की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अत्यंत सुंदर काम आहे, असे अनेक निर्णय मी घेतले आहेत. यामध्ये पारदर्शक निर्णय आहेत. तितकाच हा पण निर्णय आहे. त्यामुळे असे विचार माझ्या डोक्यात येऊच शकत नाही. मात्र आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येऊ शकतात. त्यांना दोष देत नाही, कारण त्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. त्यांना कुठेही पैसा दिसतो. कुठेही माफिया दिसतो. कुठेही भ्रष्टाचार दिसतो, ते आरोप करणारच., असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ते एबीपी माझाशी बोलत होत्या.

दरम्यान, मी माझं म्हणणं स्पष्ट मांडलं आहे. मी माझा निर्णय अगदी शुद्ध मनाने घेतला आहे. चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल. ते खाऊन लोकांचं आयर्न वाढत असेल. मला हरकत नाही, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल

शिवसेना-भाजप युती संदर्भात संजय राऊतांशी चर्चा; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला सुरुंग लागण्याची चिन्हे ; 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत