आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. भाजपाकडून निलेश राणे सिंधुदुर्गमध्ये यावेळी कुडाळ- मालवण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कंबर कसली आहे.
हे ही वाचा : मनसेत प्रवेशाचा धडाका; चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश
कुडाळ येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकजूट होत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे. निवडणूकीत गद्दारी फितूरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं. ते मी सहन केलं. पण येत्या निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली. याला पाडा, याला अमुक करा, तमुक करा असे उद्योग केले तर पाहाच, अशा शब्दात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.
दरम्यान, आघाडीला पराभूत करण्यासाठी एकजूटपणे तयारीला लागा. यावेळी विरोधकांच्या विजयाचा गुलाल नाही तर फक्त भाजपच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे, असं राणे यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच आव्हान
महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू
समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांचं ट्विट; चर्चेला उधाण