“तुम्ही संपूर्ण वेळ ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”

0
300

मुंबई :महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार काल पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांना स्थान मिळालं नाही. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे, असं म्हणत निलेश राणे यांनी रामदास कदम यांना जोरदार टोला लगावला आहे.

दरम्यान, महाआघाडीच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-‘हा’ नेता म्हणतोय शंभर टक्के सांगतो महायुतीचं सरकार पुन्हा येईल

-राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजिनामा

-कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ

-आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here