मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची Y+ दर्जाची सुरक्षा हटवून त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे कोण आहे. त्याचे महाराष्ट्रात काय योगदान? तो ठाकरे आडनावामुळे पहिली निवडणूक जिंकला, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी अदित्य ठाकरे यांच्यवर टीका केली आहे.
ह्या पेंग्विनच्या अंगावर एकही पोलिस केस नाही, कोणाची धमकी नाही व ह्याने धमकी कोणाला देण्याची ह्याची लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला?? हा उघड सत्तेचा दुरोपयोग आहे आणि हा दुरोपयोग महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नाही. ठाकरे लवकरच तोंडावर आपटणार,” असं ट्विट करत निलेश राणेंनी अदित्य ठाकेर यांच्यावर टीका केली.
ह्या पेंग्विनच्या अंगावर एकही पोलिस केस नाही, कोणाची धमकी नाही व ह्याने धमकी कोणाला देण्याची ह्याची लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला?? हा उघड सत्तेचा दुरोपयोग आहे आणि हा दुरोपयोग महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नाही. ठाकरे लवकरच तोंडावर अपटणार. https://t.co/BoTYxSHgeC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 25, 2019
मीही एका माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. माझे वडीलही मुख्यमंत्री होते. मात्र Z दर्जाच्या सुरक्षा मिळण्यामागे काही तरी पार्श्वभूमी असावी लागते. मात्र आदित्यला ती मिळण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. आदित्य ठाकरेंचे योगदान नेमकं काय? तो राजकारणात नसल्याने कोणाचे नुकसान होणार आहे.” असा सवालही निलेश राणेंनी केला आहे.
दरम्यान, मी माजी मुख्यमंत्राचा मुलगा आहे. मला कधीही Z दर्जाच्या सुरक्षा नव्हती. अमित देशमुख यांनाही कधी नव्हती. मग आदित्य ठाकरेंच्या Z दर्जाच्या सुरक्षा मागचे नेमकं कारण काय?” असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?
-महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे
-अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर रोहित पवार म्हणतात…
-देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली- शरद पवार