आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेले तीन दिवस मुंबई आणि पुणे ईडीच्या कारवाईने हादरलं आहे. या तीन दिवसात ईडीने जवळपास 16 ते 17 ठिकाणी छापेमारी केली असून ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे.
पुण्यातही अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.अशातच आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
ही बातमी पण वाचा : “अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत कुणाला घ्यायचं हे…”
कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी चोकशी होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना कोव्हिड घोटाळा झाला होता. कोव्हिड टेंडर प्रक्रियेत हा घोटाळा झाला होता. या प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना लवकरच समन्स बजावून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
उध्दव ठाकरेंना धक्का; ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेची कारवाई
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात का केली?; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…