जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय या निवडणुकीतून भाजपने सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले. यानंतर महाविकास आघाडीचा जिल्हा बँकेवर सत्तास्थापनेसाठी मार्ग मोकळा झालाय असं वाटत असतानाचं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या समोर आता शेतकरी पॅनेलचे आव्हान निर्माण झालंय.
हे ही वाचा : एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित
भाजपने जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर महाविकास आघाडी जिल्हा बँकेवर सत्तास्थापनेसाठी सज्ज होती. मात्र महाविकास आघाडीला आता शेतकरी पॅनल टक्कर देणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेत 21 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. भाजपने माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील 11 उमेदवार बिनविरोध झाले. आता 10 जागांसाठी मतदान होत असताना सर्वपक्षीय प्रस्थापितांनी विकास शेतकरी पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बाॅसमध्ये जावं- निलेश राणे
शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा
मनसेत प्रवेशाचा धडाका; नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश