राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पक्ष मजबूतीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘या’ चेहऱ्यांना संधी

0
502

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये विद्यार्थी काँग्रेसचं उभरतं नेतृत्व आकाश झांबरे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झांबरे यांनी अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचं काम केलं आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिकेने बाबासाहेब पुरंदरेंच्या कलादालनाची निर्मिती करावी; भाजपची मगाणी

विद्यार्थी संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी अजून  काही नियुक्या जाहीर केल्या आहेत. यात रोहन सोनवणे यांची प्रदेश सरचिटणीस सर्व विद्यापीठ आणि सिनेट कौन्सिल, सुयश राऊत प्रदेश सरचिटणीस शिष्यवृत्ती विभाग, आदित्य देशमुख प्रदेश संघटक, रॉबिन कुंजुमोन प्रदेश सचिव, रोहित गमलाडू प्रदेश सचिव, सोनिया नरेश लुंड कोकण विभागीय उपाध्यक्ष व्यवस्थापन, हिंमाशू पंचबुधे पूर्व  व पश्चिम विभागीय उपाध्यक्ष कृषी विभाग, योगेश बागुल शहराध्यक्ष मालेगाव बाह्य, मिर्झा नईम अहमद मुनव्वर बेग अध्यक्ष मालेगाव मध्य या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तळागाळात पक्षाच्या विस्तारासाठी कंबर कसली असून पक्षाची विचारधारा शहरापासून गावापर्यंत पोहचवण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी एक चांगलं माध्यम आहे. हे पाहता राष्ट्रवादी पक्षाने आपल्या विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये विविध भागांतील तरुणांना स्थान दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची टीका

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here