Home महाराष्ट्र मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन; वयाच्या 58 व्या वर्षी...

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं आज निधन झाले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा : काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समजतं.

दरम्यान, माधवी गोगटे यांनी मराठी चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच माधवी यांनी ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

महत्वाच्या घडामोडी –

जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांंचं सूचक विधान

शिवसेनेमुळेच औरंगाबादचा विकास झाला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा!

“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे परत आणू; भाजप खासदाराच्या विधानाने खळबळ”