“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा हाॅस्पिटलमध्ये”

0
173

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, की…;राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here