मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर चर्चा केली. आम्ही केवळ 4 ते 5 जागा मागितल्या, पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, राजद नेते तेजस्वी यादव यांच्याशी आम्ही चर्चा केली. बिहारमध्ये भाजप, जेडीयू यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र ते झालं नाही. त्यामुळे बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत, शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असं पटेल यांनी स्पष्ट केलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”
उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; झोपेत असलेल्या 3 बहिणींवर अॅसिड हल्ला
देवेंद्र फडणवीसजी ‘हा’ अहंकार होता काय?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा फडणवीसांना सवाल
‘या’ कारणासाठी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल रूग्णालयात दाखल