राष्ट्रवादीचा भाजपला मोठा धक्का; भुसावळमध्ये 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
558

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव :  भुसावळमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडत नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणलं आहे.

राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय.

हे ही वाचा : मोठी बातमी! मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड; कोयत्याने वार करून फोडली गाडी

एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

दरम्यान, 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार

“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here