आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.
शरद पवारांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयांचं समर्थन केलं आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेली असतानाचा आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा बाॅम्बस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं हे…”; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरु आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहित नाही. कर्नाटकातही राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील कालच्या भाषणात केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या मताची विभागणी करता येईल का? भाजपला विजय मिळणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. कुणाकुणाची तिकीटं कापली, काय काय चाललं, इथे मी ऐकलं की, महाराष्ट्रातील आमच्याबरोबरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत आहे. काय झालंय? ते अजून आमच्यासोबत आहेत. पण किती दिवस असतील ते माहिती नाही. कारण त्यांची भाजपसोबत बोलणी चालली आहे. त्यांच्याबाबत रोज बातम्या येत आहेत की कोण जाणार आणि कोण थांबणार. कोणी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे, असा गाैफ्यस्फोट पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“मी राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”; शरद पवारांची मोठी घोषणा
RCB कडून अनुष्का शर्माला स्पेशल बर्थडे गिप्ट; निर्णायक सामन्यात RCB चा लखनाैवर 18 धावांनी विजय