Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट

राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.

शरद पवारांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र तरीही शरद पवार निर्णयावर ठाम राहिले. या सगळ्या घडामोडीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर ठरलं; या’ दिवशी होणार राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब?

पवार साहेब अत्यंत हुशार नेते आहेत. त्यांना माहिती होते की आपला वजीर आपल्याला निघून चालला आहे. अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. लवकरच 40 आमदारांसह वजीर गायब होणार होता, तो लवकरच गायब होणारच आहे. आज त्यांना पक्ष टिकवण्यासाठी हा सर्व खटाटोप करावा लागत आहे, असं महेश शिंदे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादीत दोघं मुख्यमंत्री होणार?, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याविषयी शिंदे यांनी विचारलं असता, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसे होणार हा प्रश्न आहे, ज्यांची क्षमता आहे त्यांना मुख्यमंत्री करायला हरकत नाही., असं उत्तर शिंदे यांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गाैतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मोठी बातमी !महा विकास आघडीतून ‘राष्ट्रवादी बाहेर पडणार’? काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत