Home महाराष्ट्र राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. याच मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. राज ठाकरे हे कोकण सध्या दौऱ्यावर असून त्यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

‘शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली’ अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा : “निवडणूक गुजरातची असो की, महाराष्ट्राची, तुम्हांला गरज बाळासाहेब ठाकरेंचीच”

जयसिंगराव पवारांना मी पहिल्यांदा भेटलो नाही. गटबाजीला चाळण लावण महत्त्वांचं आहे. राष्ट्रवादीने हे जातीय राजकारण सुरू केलं आहे. जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जातं. याची सुरुवात राष्ट्रवादीने केली.  मराठा समाज आणि इतर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले  जातंय आहे. 1999 पासून हे विष कालावलं जात आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हीच नाव घेतात, शरद पवार महाराजांचं नाव का घेत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

“अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला?; ‘या’ दिवशी भाजप-शिंदे गटातील ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद”