आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं छापेमारी केली. तसंच पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही जेवढा त्रास द्याल तेवढ्याच ताकदीने राष्ट्रवादी लढण्यास तयार आहे. एकदाचा होऊ द्या सामना, असं खुलं आव्हान नवाब मलिक यांनी भाजपाला दिलं आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
या राज्यात किंवा जिथे जिथे विरोधी पक्षांचे सरकार आहे त्या सर्व ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या माध्यमातून त्या त्या सरकारला बदनाम करुन दबाव निर्माण करायचा. बंगालमध्येही अनेक नेत्यांना ईडी चौकशीच्या साहाय्याने दबाव आणून त्यांना पक्षात घेतले. महाराष्ट्रात बरेच नेते भाजपात गेले त्यांच्यावरही ईडीचा दबाव होता. पण आमच्या तिन्ही पक्षांचे नेते भ्याड नाहीत, ते अशा दबावाला बळी पडणार नाहीत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, तुम्ही जेवढा दबाव आमच्यावर टाकाल, तेवढ्या अधिक ताकदीने हे सरकार कामाला लागेल. या सगळ्या कारवाया जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही दरोडेखोर”
शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही; आदित्य ठाकरेंचा इशारा
जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये जनतेनं भाजपला जमिनीवरच ठेवलं; संजय राऊतांचा टोला