Home महाराष्ट्र विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील

विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे भाजप त्यांचा संबंध दाऊदशी जोडत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी मुस्लिमांना खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. ते आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा गाैफ्यस्फोट

हा जो अट्टहास आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राजीनामा होत नाही, असा थेट आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला

भाजपची काळजी करू नका, स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनून दाखवा; भाजपचा पवारांवर पलटवार

देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका