आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपची युती तुटली. आणि याचा फायदा राष्ट्रवादीने घेतला. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र यूती करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र आता या ठिकाणी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र आल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा : “कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही”
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उमेदवार असणाऱ्या सोसायटी मतदार संघात भाजपने राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केल्याची माहिती आहे. डॉ. सुरेश भोसले, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे यशराज पाटील, अॅड. आनंदराव पाटील हे नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारी नेतेमंडळी आता मात्र मतदान केंद्राबाहेर एकत्र गप्पा मारताना दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”
एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत एकाच सोफ्यावर; चर्चांना उधाण
पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे