नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; भाजपची मागणी

0
524

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : नवाब मलिक  यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली आहेत. औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबादमधील क्रांती चौकात आज भाजपचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला.

हे ही वाचा : एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला सांगितला मार्ग; म्हणाले…

दरम्यान, शहरातील क्रांति चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

“टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here